सोड ना बोट चाल ना एकटा..
या रंगीत चोची टोचणारच ना राव
तुम्ही टोचून घ्या अँन्टी काहीतरी
अगऽऽ माझे बाय तुला माझी आठवण झालीच कशी???
फॉरमॅट मारून घे मेंदूला
भावडया गाऊ नको इश्काची गाणी
डोळ्यातल्या पाण्याला
मार्केट नाय....
आपल्यामधील शांतता बोलकीये
सांगू पाहतेय एकमेकांना आपल्यामधील निर्माण झालेल्या अंतराबाबत
मधोमध एक सीमारेषा आहे अंधुकशी पुसट..ती आहे मात्र सत्य...
दरवेळी आपण उभे येवून ठाकतो सीमारेषेवर अन् स्तब्ध होतो थिजून जातो दगडासारखे
अशा वेळी शब्द अनाथपणे घोटाळत बिलगत राहतात पण
आपण फक्त अंदाज घेत राहतो एकमेकांच्या अस्तित्वाचा अन् निमूटपणे परततो माघारी हिरमुसलेले
गोठ्यात परतावी गाय करुण डोळे घेवून जसे अन् दावणीला बांधून घेतो स्वतःला रोजच्या रहाटगाडग्याला
दररोजचा दिवस
एक नकोशी सवय
एक नकोशी चालढकल, फरपट.....
येथे प्रत्येकाला आपण थोर आहोत असा साक्षात्कार होतो
आपण महान असे अधुनमधून वाटत राहते उगीचच येथे
आपल्यावर फार अन्याय झालाय
आपणच खरे ट्रॅजीडी किंग असे मनात येते
प्रत्येकाच्या येथे
खरे सुपरस्टार आपणच आहोत
असे ठणकावून तर कधी कानात सांगतो येथे प्रत्येकजण...
खर तर आपण किती खोल पाण्यात आहोत
हे माहीत असूनही
इतरांची मापे काढतो आपण
मी तर समुद्राचा साधा थेंब म्हणत
आपण ठरवून सर्वोच्च पदाकडे अंतिम कूच करतो
स्वतःच स्वतःला फसवत आपण
झूठी कबर होवून बसतो येथे.
माझ्या कविता वाचून
काहीजण म्हणतील बरीये
अत्यंत बोगस रद्दड
काहींच्या मते..
खोटी आहे भोंदुगिरी नुस्ती
असेही म्हणतील काहीजण
कोणी काही म्हणायच्या आधीच
मीच म्हणवून घेतलय काहीजण
काय म्हणतील या नावाखाली
आणि हे सांगून अमर व्हायचय मला
माझ्या कवितेसकट...
मनाला हेही सांगून ठेवलय की
लोकांची तोंडे शिवता येण अवघड आहे एकूणच...
विषय साधा सोप्पा सरळ करायचा असतो अवघड
प्रतीके पेरत पेरत वाकडे झाड दाखवत
लटकवून टाकायचे त्याला एखादे घुबड
उगाचच असंबद्ध बडबडत
भुंकत राहायचे काही बाही
ओढायचा कोरा ताव घ्यायचा नक्षीदार पेन
रिती करायची शाही....
आशय विषय विसरून शीर्षकाला
द्यायचा संदर्भहीन घटस्फोट
घालायचा गोंधळ स्वतःचे संबळ वाजवत
वाचकाला ठरवायचे अडाणचोट
वाढवायची गुंतावळ केसं दाढी मिशा
अन् कानानाकात एखादे डूल
घालायची चित्रविचित्र कपडे
पांघरायची आधुनिकतेची झूल
उगाचच भांडायचे परंपरेशी
व्यसने रिचवता रिचवता
अर्धवट वाचून व्हायचे लाल पिवळे
अन् बोंबलत राहायचे नवता नवता...
अस्सा वस्सऽऽऽकन अंगावर येतो ना दिवस
टूथपेस्ट मधल्या पेस्ट सारखा
पसरतो भस्सऽऽकन एकदम
मग बसावे लागते घासत कित्येक काळ.
चूळ भरून कंटाळा बाहेर टाकला तरी
अडकून पडतात कण...
रोजची भणभण सुरु होते
दात कोरून पोट भरायची.
आपल्याला आकडेमोड जमत नाही अन्
जोकरला राणी बधत नाही
रिकाम्या मेंदूचा होतो बेफाम घोडा
दिवसा चार ओळी
रात्रीला औषधमिश्रित सोडा.
तू म्हणायचास अनुभव घेणं बाप
मग अलाणे, फलाणे, पुस्तके, पी.एच.डी ग्रंथ, रद्दी, वाणसामान.
मी म्हणायचो पुस्तके बाप, पुस्तके गुरू, पुस्तके मित्र,
पुस्तके आयुष्य बाकी सब झूठ है
यार ....
तू म्हणायचा जगणं महत्त्वाचं.
पुस्तकाच्या पानात मावत नाही रे दुनिया
मी म्हणायचो एकदा शिरून पहा पानात
तुला दाखवतो दुनिया, दुनियेच्या आतली दुनिया
असं मी बडबडायचो काहीबाही सतत..
तू म्हणायचास
भानावर ये, बाहेर ये
मी म्हणायचो बेभान हो, खोलवर जा.
तू जमवायचास माणसे अवतीभवती अन् बोलायचास
त्यांच्याशी बरेच काही.
मी पुस्तकांच्या गराड्यात
सोबत घेऊन प्रश्न शोधत बसायचो
काहीबाही.
न चुकता आपण भेटत राहायचो एकमेकांना
तुझे चमत्कारिक अनुभव ऐकून
मी स्तब्ध व्हायचा
माझ्या कहाण्या कविता ऐकून
तू चकित....
एकदा तू म्हणालास
एखादे पुस्तक असेल तर दे वाचायला.
आणि मी म्हणालो
चल बसू या भर चौकात
रद्दी विकायला
शुभेच्छुक :- भूषण राक्षे