Wednesday, November 16, 2011

औषधमिश्रित सोडा.



अस्सा वस्सऽऽऽकन अंगावर येतो ना दिवस
टूथपेस्ट मधल्या पेस्ट सारखा
पसरतो भस्सऽऽकन एकदम
मग बसावे लागते घासत कित्येक काळ.
चूळ भरून कंटाळा बाहेर टाकला तरी
अडकून पडतात कण...
रोजची भणभण सुरु होते
दात कोरून पोट भरायची.
आपल्याला आकडेमोड जमत नाही अन्
जोकरला राणी बधत नाही
रिकाम्या मेंदूचा होतो बेफाम घोडा
दिवसा चार ओळी
रात्रीला औषधमिश्रित सोडा.

1 comment: