Friday, June 1, 2012


कविता 
        
हिरव्यागार पानाची 
पिवळ्या धम्मक उन्हाची 
तुझ्यासाठी लिव्हतो कविता 
माझ्या खुळ्या मनाची 

आभाळ देते रानाला 
टपोऱ्या थेंबांची माळ 
वारा गातो मुक्तछंद 
कोवळे फुल जणू निरागस बाळ 

कोऱ्या कोऱ्या, पांढऱ्या शुभ्र पानाची 
देखण्या काळ्या रंगाची 
तुझ्यासाठी लिव्हतो कविता 
माझ्या खुळ्या मनाची 

जांभूळल्या डोंगरामागे आला 
गर्द नारिंगी गोळा 
आकाशाचा शेला जणू 
पाण्यामंदी बुडाला 

गायीच्या करुण डोळ्यांची 
आईच्या काजळमायेची 
तुझ्यासाठी लिव्हतो कविता 
माझ्या खुळ्या मनाची.

भूषण राक्षे.