पोरी ऽऽऽ
तूच तर दिली होती लाईन इष्काची गाणी गाईन
म्हणता म्हणता फाफललो
आली होती भलतीच संधी पण
हातातून निसटली फांदी आत्मविश्वासापाई कोसळलो
घेतलेल्या सोंगाचा वाजला भोंगा
तरी चारित्र्याची अनवट पिपाणी ओकलो
बोटं मोडत कित्येक हातांनी दिलेले तळतळाट
तरी डोळे मिटून मिठू मिठू पोपट होत खोटेखोटे झोपलो
उरल्या आयुष्यात रचल्या कविता
म्हटली शायरी, फुल इमोशनल फिल्मी गाणी
एकांत प्यालो
आठवण येता तुझी
गायीच्या करुण डोळ्यात व्याकूळ हंबरून
बुडालो
भाऊ पाध्यांच्या सुंदर 'बगीचा'तली शिवी
-
*भाऊ पाध्ये* (१९२६ - १९९६)
[छायाचित्र : आरती साळुंके यांच्या संग्रहातून]
लेखक भाऊ पाध्ये यांचं जन्मशताब्दी वर्ष परवाच्या २९ नोव्हेंबरपासून सुरू
झालं. काही...