हे लडिवाळ मांजर माउली
कित्येकदा बोलतो ना मी तुझ्याशी तासनतास
किती निमुटपणे ऐकून घेतेस शांत राहतेस
प्रेमाने घुटमळतेस आसपास
माझं व्यक्त होण अणि तुझं अव्यक्तपणे
सारं काही समजाउन घेणं
ना नफ़ा ना तोटा
ना व्यवहार ना अपहार
तुझ्या मुखावाटे बाहेर पडणा~या
भाषेतून माझं सनातन अनाथपणाच दु:ख
सनाथ होते अपरंपरापार
हे कारुण्यसिंधू गोमाते
तुझ्या डोळ्यांत बुडून जाताना
थिटं होत जातं
माझं गोठवून ठेवलेले दु:ख
तुझ्या व्याकुळ हंबरड्यात
स्वत:ला विरघळून टाकताना
मी सोशीकतेच्या मुळाक्षरांची
बाराखडी गिरवू लागतो
वेश्यांच्या चेह~यावरची दु:खं
स्वत:पेक्षा अगणित मोठी असल्याने
सहन होत नाहीत
मला म्हणून मी रस्ता टाळू पाहातो
मान खाली घालून तरीही
चेहरे दिसू लागतात आसपास।
त्यांच्या डोळ्यातील कुठल्याही
मजबूर प्रश्नापुढे मी
गुडघे टेकतो।
समस्त जगाच्या वतीने
मी माफ़ी मागतो तुमची
माझ्या आया-बहिनींनो।
स्वत:च्या दु:खाबद्दल मोजून मापून
लिहिणारा आणि बोलणारा मी
तुमच्यासमोर भणंग भिकारी आहे।
लाचारीपोटी समस्त जगापुढे
हात पसरणा~या आणि
सा~या जगाचे निखारे
पदरात घेणा~या माताभगिनींनो
मी तुमचा
अनंत काळचा अपराधी आहे।
मला माफ़ करा. मला माफ़ करा।
वर्षभरातल्या नोंदींनिमित्त
-
२००९-१० साली केलेलं मुखपृष्ठ
गेली सुमारे चौदाहून अधिक वर्षं एखादं अनियतकालिक चालवावं तशा धारणेतून 'रेघ'
ओढत आणली आहे. त्यात २०२५ हे नवीन वर्षं. सध्याच्या ...
No comments:
Post a Comment