कविता
हिरव्यागार पानाची
पिवळ्या धम्मक
उन्हाची
तुझ्यासाठी
लिव्हतो कविता
माझ्या खुळ्या
मनाची
आभाळ देते रानाला
टपोऱ्या थेंबांची
माळ
वारा गातो
मुक्तछंद
कोवळे फुल जणू
निरागस बाळ
कोऱ्या कोऱ्या, पांढऱ्या शुभ्र पानाची
देखण्या काळ्या
रंगाची
तुझ्यासाठी
लिव्हतो कविता
माझ्या खुळ्या
मनाची
जांभूळल्या
डोंगरामागे आला
गर्द नारिंगी गोळा
आकाशाचा शेला जणू
पाण्यामंदी बुडाला
गायीच्या करुण
डोळ्यांची
आईच्या काजळमायेची
तुझ्यासाठी
लिव्हतो कविता
माझ्या खुळ्या
मनाची.
भूषण राक्षे.