Monday, January 17, 2011

शाळा


आज साळत मास्तर आन् म्या फकस्त
मास्तर तापला बाळ्या बाकीची गबाळ कुठ गेली?
म्या म्हटल धोंड्याची म्हैस येली आन्शाम्याची माय मेली
म्या
चिडीचाप

मास्तर परत खवताळला
बाकीची गायबान कुठ गेली?
म्या म्हटल शिरप्या हिर खनतूया आन्दगड्या उसाला पाणी भरतूया
म्या
चिडीचाप

मास्तर आणिकच पिसाळला
आन् उरली सुरली घुबड कुठ मेली?
म्या म्हटल राधी भाकरी थापतीया आन्काशी धुन धुतीया
मास्तर म्हटला शाना हाईस सगळ्यांचा सातबारा माहीत असतूया तुला
एकला कायला तरफाडला साळत फुकन्या?
म्या
चिडीचाप

मास्तर म्हटला घ्ये लिहून थॉड फार पुस्ताक काढ
म्या म्हटल माझी पाटी कॉनीतरी चोरली फकस्त पुस्ताक हाय माह्यापाशी
मला वाटल मास्तर धडा शिकवीलपण ते आणिकच खवताळल
पळ घरी भूतखान्या उद्या ये पाटी घेऊन एकल्यासाठी टाळ कुटु काय म्या?
आज सुट्टी साळला
मास्तरन साळला टाळा ठोकला आन्पुण्यतीथी हाय म्हणून बोंबा मार म्हटला
पण उद्या साळत येऊन म्या काय करू?
माझा बा मला पाटी देनार पण ती गुराच शान भरायची
मला साळत जायचय पण मास्तर आड हाय आन् बा हिर
.

6 comments:

  1. गावोगावची कथा आणि व्यथा नेमकी मांडलीत तुम्ही!

    ReplyDelete
  2. सही...खूपच मस्त...!!! :-)

    ReplyDelete
  3. ekdam avadali kavita

    ReplyDelete
  4. मला साळत जायचय पण मास्तर आड हाय आन् बा हिर << layich baap line

    ReplyDelete
  5. खूप छान आणि सुंदर लेखन केले आहे.

    ReplyDelete
  6. खूप छान आणि सुंदर लेखन केले आहे.

    ReplyDelete