Wednesday, November 23, 2011

फ्याशन...

विषय साधा सोप्पा सरळ करायचा असतो अवघडप्रतीके पेरत पेरत वाकडे झाड दाखवतलटकवून टाकायचे त्याला एखादे घुबडउगाचच असंबद्ध बडबडतभुंकत राहायचे काही बाहीओढायचा कोरा ताव घ्यायचा नक्षीदार पेनरिती करायची शाही....आशय विषय विसरून शीर्षकालाद्यायचा संदर्भहीन घटस्फोटघालायचा गोंधळ स्वतःचे संबळ वाजवतवाचकाला ठरवायचे अडाणचोटवाढवायची गुंतावळ केसं दाढी मिशाअन् कानानाकात एखादे डूलघालायची चित्रविचित्र कपडेपांघरायची आधुनिकतेची झूलउगाचच भांडायचे परंपरेशीव्यसने रिचवता रिचवताअर्धवट वाचून व्हायचे लाल पिवळेअन् बोंबलत राहायचे नवता नवता...No comments:

Post a Comment