एकदा वर्गात कोणीही नसताना
मी तुझे नाव फळ्यावर लिहीले
माझ्या नावासमोर
आणि खिशातल्या रूमालाने पुसून टाकले
डस्टर टेबलावर होता तरीही...
स्वतःपुरते ग्लोरिफीकेशन केले
आणि आनंद घेतला
वर्ग सारा शांत होता त्यावेळी
पण वर्गातल्या टेबलखुर्चीला, बेंचेसला
देवीच्या तसबिरीला आणि कच-याच्या डब्याला मात्र
हे प्रकरण ठाऊक झाले खरे
त्यांचे एक बरे होते
निमूटपणॆ पाहत होते बिचारे
खुप आधार वाटला या सर्वांचा
वाटले आपण व्यक्त झालो कोणासमोर तरी...
मोरपिसासारखा तरंगत होतो त्या दिवशी
घरी येऊन रेडिओवर गाणी ऐकली इश्क मुहोब्बतची
किती उकळ्या फुटत होत्या म्हणून सांगू...?
वासरा सारखा हूंदडत राहिलो इकडे तिकडे दिवसभर
शांत होऊन घरी आल्यावर
एक पत्र लिहिलं तुला एकांतात
त्या दिवशी झोपही आली नाही रात्री ...
हा सारा दिवस अजूनही आठवतो आहे मला
तुला स्मरायचे कारण नाही
कारण यातले तुला काहीच ठाऊक नाही...
विस्मृतीच्या विरोधात
-
पेंग्विन / वायकिंग
बेला भाटिया गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ समाजवैज्ञानिक, मानवाधिकारविषयक
खटले लढवणाऱ्या वकील आणि कार्यकर्त्या म्हणून काम करत आल्या आहेत...